

पुणे, (प्रतिनिधी) - पुण्याच्या महापौरपदी मोहनसिंग राजपाल यांनी निवड झाली आहे. त्यामुळे गणपती बाप्पा मोरयाच्या बरोबरच बोले सो निहाल सत् श्रीयकालच्या ना-याने पुणे महापालिकेचे आवार दणाणून गेले. पुणे शहराचे महापौरपद प्रथमच शीख समाजाला मिळाले आहे.
पुणे शहराच्या 51 व्या महापौरपदासाठी निवडणूक झाली.त्यात सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसने सेनाभाजपची साथ सोडल्याने त्याजागी त्यांनी काँग्रेसने साथ दिल्याने थप्पींग मताधिक्याने राजपाल आणि उपमहापौर पदी प्रसन्न जगताप निवडून आले. त्यातील प्रसन्न जगताप यांना महापालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकरले होते. त्यामुळे त्यांना काँग्रेसने जाहीर केलेला त्या वॉर्डातील उमेदवार बदलून जगताप यांना तिकीट दिले व ते सहज निवडून आले.
यावेळी महापौरपद खुल्यागटासाठी होते त्यामुळे कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता
होती. नेमकी पवार यांनी मोहनसिंग राजपाल यांना संधी देत पुण्यातील परप्रातियांना
आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. तसेच पिंपरी चिंचव़डमध्ये योगेश बहल या पंजाबापुतरला महापौरपदी बसवत तोच संदेश दिला. पुण्यात काँग्रेसने मात्र ज्यांना
राष्ट्रवादीने तिकीट नाकारले त्या प्रसन्न जगताप यांनाच उपमहापौर पदासाठी उमेदवारी देत
अजित पवार यांना त्यांची चूक दाखवून दिली.
काँग्रेस गेली पावणेतीन वर्षे सत्तेपासून दूर होती. त्यांना अजित पवार यांनीच दूर ठेवत
पुणे पॅटर्नच्या नावाखाली सेनाभाजपची साथ घेऊन सत्ता स्थापन केली होती. मात्र
विधानसभा निवडणुकीत सुरेशभाई कलमाडी व अजित पवार यांचे प्रिती बोजन झाले आणि
त्यांच्यातील मतभेद संपले. त्यामुळे महापालिकेत काँग्रेसला सत्तेत जाण्याची मिळालेली
संधी त्यांनी या महापौर निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्षात राष्ट्रवादीशी जवळीक साधली.
विरोधी पक्षनेते पद कोणाकडे
या निवडणुकीत काँग्रेसने इमानदारी दाखवत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले.
तसेच उपमहापौरपदी त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणला. त्यामुळे लगोलग
महापालिका वर्तुळात विरोधीपक्षनेते पदाबाबत चर्चा सुरू झाली.मागच्यावेळी सिंगल लार्जेस्ट
पार्टी म्हणून उच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला देण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार सध्या आबा बागूल विरोधी पक्षनेते आहेत.
या निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी पक्षाला मतदान केले इतकेच नाही तर सत्ताधारी
पक्षाच्या मदतीने त्यांच्या उपमहापौर केला आहे. यावेळी मतदान गुप्तपणे न होता आवाजी
मतदानाने ही निवडणूक झाली. तसेच जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी य़ांच्या अध्यक्षतेखाली
सभा झाल्याने सत्ताधारी पक्षाच्या बाजूने कोणी मतदान केले तर विऱोधी उमेदवाराल कोणी
मतदान केले याचे तेच साक्षीदार असल्याने विरोधीपक्षनेते पद काँग्रेसक़डून जाण्याची
शक्यता अधिक आहे. त्यासाठी भाजपच्या गटनेत्या मुक्ता टिळक यांनी मोर्चे बांधणी सुरू
केली आहे.
या निवडणुकीनंतर भाषणातून नविनर्वाचित महापौर तसेच माजी महापौरांच्या आभार
मानण्याची संधी न दिल्याने टिळक यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहाची गेली पन्नास
वर्षे असलेली ही परंपरा सत्ताधा-यांनी विजयाच्या धुंदीत मोडली आहे. मागच्या राजलक्ष्मी
भोसले यांच्या निवडीनंतर त्यांच्या अभिनंदानाची भाषणे सभागृहात झाली होती, ती
यावेळी न करताच सभा संपल्याचे नवनिर्वाचित महापौर राजपाल यांनी जाहीर केले.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या