

पुष्पऔषधी या स्वभाव दोष घालवणा-या औषधी आहेत हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आलेच असेल. ज्याप्रमाणे भिती किंवा धांदरटपणा घालवण्यासाठी औषधी उपयोगी पडताता त्याच प्रमाणे अहंकारी स्वभाव बदलण्यासाठीही "वीच" नावाच्या औषधीचा उपयोग होतो.
एक विद्यार्थीनी शिकण्यासाठी पुण्यात आली. आता तिचे जवळचे कोणीच नसल्याने ती लांबचे पण एक नातेवाईक होते त्यांच्याकडे सुरूवातीला रहात होती. ती ज्यांच्याकडे रहात होती त्या काकू स्वभावाने चांगल्या होत्या पण त्यांचे यजमान त्यांच्याशी तुटकपणे वागत असता ही बाबा सुरूवातीला त्या मुलीला खटकली पण काही दिवसाताच तिला परिस्थ्तिची जाणिव झाली. त्या काकूंना दोन मुले होती पण ती मुले त्यांच्याजवळ रहात नव्हती. एकूण वातावरण बघून त्या मुलीने अखेर होस्टेलवर रहाण्याचा निर्णय घेतला आणि एक दोन दिवसातच ती चंबूगबाळे घेऊन होस्टेलवर रहायला गेली.
चांगले घर असूनही त्या मुलीवर किंवा त्या मुलांवर बाहेर रहाण्याची वेळ आली कारण त्या काकूंचा स्वाभाव....त्यांच्या स्वभाव शिस्तबद्ध होताच पण ती शिस्त फार टोकाची होती. इतरांचा अव्यवस्थीतपणा त्यांना जराही सहन होत नसे. त्याच प्रमाणे कोणी अहरिहर्य कारण सांगितले तर ते त्यांना पटत नसे. त्यांचे घरातल्यांच्या स्वभावाशी जुळत नसल्याने काकूंचा स्वभाव टिकाखोर व असंयमी होत चालला होता आणि हेच कारण त्या मुलीला होस्टेलवर घेऊन गेले. काकूंच्या या स्वभावामुळे त्यांच्या जवळची माणसे त्यांच्यापासून तुटत दूर चालली होती. त्यामुळे त्यांना जेव्हा औषध द्यायची वेळ आली तेव्हा हा सगळा वृत्तांत ऐकल्यावर त्यांना बीच शिवाय पर्याय नाही हे लक्षात आले. त्या काकूंना बीच द्यायला लागल्यावर हळूहळू त्यांच्या स्वभावात पालट होण्यास सुरूवात झाली आणि तो बदल पुढे इतका वाढत गेला की त्या काकूंच्याही लक्षात ही गोष्ट आली. काकूंकडे व्यवस्थितपणा तर होताच पण त्यांचा टोकाचा आग्रह धरण्याची वृत्ती कमी होत गेली. त्यांची प्रवृत्ती मवाळ होत गेली आणि वास्तवाचा स्वीकार त्या करायला लागल्याने त्यांच्या जवळची माणसे पुन्हा एकदा त्यांच्या जवळ आली.
शिस्तप्रिय असणे केव्हाही चांगले पण सर्वांनाच आपल्या शिस्तीत वागायला लावणे चांगले नसते. त्याचा विपरीत परिणाम होतो जो काकूंच्या बाबतीत झाला होता. आपण शिस्तबद्ध राहून इतरांच्याही भावनाची कदर करण्याची प्रवृत्ती जोपासायला हवी पण तसे होत नाही. अनेकवेळा या शिस्तीचे नको इतके कौतुक झाली की हळूहळू त्या व्यक्तीत अहंकार जमा होऊ लागतो जो इतरांना त्यांच्यापासून दूर घेऊन जातो. त्या व्यक्तीचा काटेकोरपणा किंवा व्यवस्थितपणाचे नको इतके स्तोम माजवल्याने किंवा ते कुटुंबातील इतरांवर लादण्याच्या प्रय़त्न इतरांना जाचक ठरू लागतो. कारण त्या व्यक्तीला व्यवस्थितपणाचे किंवा काटेकोरपणाचे फायदे कळतात आणि त्याचा आग्रह इतरांवर धरू लागतात. याचा अतिकेर झाला की काय होते ते वरच्य उदाहरणात समजते. आपल्याच जवळची माणसे आपल्याला दुरावतात.
अशा व्यवस्थित किंवा शिस्तप्रिय व्यक्ती पोलिस दल किंवा न्याययंत्रणेत चांगले काम करू शकतात. चांगले प्रशासक होऊ शकतात. अतिव्यवस्थितपणा असणा-या व्यक्ती बीच घेताना त्यांच्या होणारे बदलांची नोंद ठेवतात किंवा त्यांनी ठेवली तर ते त्यांच्या उपयोगी पडते. त्यातून त्यांना त्यांच्यात पूर्वी काय दोष निर्माण झाले होते याची जाणिव होत जाते आणि अखेर ती व्यक्ती इतरांना समजावून घ्यायला लागते.
बीच चे झाड 60 ते 100 फूट वाढते. त्याला लांब देठाची, लोबकाळणारी जांभळ्या तापकिरी रंगांची फुले येतात. ही फुले साधारण एप्रिल मे महिन्यात येतात.
महत्वाची लक्षणे
- असंयमी स्वभाव
- स्वताःच्या विश्वाबाहेर काही असू शकत नाही ही धारणा होते
- कायम दुस-याचे दोष शोधतात
- इतरांवर फक्त टीक करण्यात यांना शहाणपणाचे वाटते
- इतरांबद्दल सहानभूती वाटत नाही
- आपली चूक किंवा हार मान्य न करण्याची वृत्ती यांची होत जाते.
- या सगळ्याच परिणाम म्हणजे अहंकार वाढत जातो.
- सगळयांनी आपल्या विचाराप्रमाणेच वागले पाहिजे अशी त्यांची धारण होते.
हे सुद्धा लक्षात घेतल पाहिजे..
पुष्पऔषधी ही लक्षण साधर्म्यावरून दिली जातात. गोळ्या किंवा अर्काच्या स्वरूपात ही औषधे उपलब्ध असून त्यांच्या सेवनाचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही हे जरी धरे असल तरी केवळ लक्षणांच्या सारखेपणा वाटल्याने रूग्णांनी ही कोणतिही औषधे परस्पर घेतल्याने उपचाराची दिशा बदलण्याची शक्यता असते म्हणून पुष्पऔषधी या तज्ञांच्या सल्ल्यनुसारच घ्यावीत.
919422016830
dipali.ladkat@yahoo.com
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या