Skip to content
जाहिरात

मिलिंद काची म्हणतात की राजकारणापेक्षा समाजकारण बरे!

December 8, 2009

पुणे म्हणजे कार्यकर्त्यांचे शहर... येथील प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे एक संस्था आहे असे स्व. वसंतदादा पाटील म्हणायचे. त्यांचे म्हणणे कार्यकर्त्यांनी खोट पाडले नाही. हीच
परंपरा आजही मिलिंद काची सारख्यांना टिकवून ठेवली आहे.
मंडईत गाळा...त्यात घरची शेती..असे असणारे आज राजकारणात जाताना दिसतात. त्यात घऱातच सामाजिक कामाचे संस्कार झालेले असले तर ती आणखी एक जमेची बाजू त्यांची ठरते. त्यामुळे त्यांना राजकारणात सहज प्रवेश मिळतो. पण हे सगळ असूनही मिलिंद काची यांना मात्र राजकारणाचे ग्लॅमर आकर्षीत करू शकले नाही.
काची कुटुंबात जन्म झालेले मिलिंद काची हे पुण्याचे महापौर नामदेव काची यांचे नातू.
सरस्वती विद्या मंदीर या शाळेतून शिक्षण घेतल्यावर त्यांनी पुढे काही शिकण्या ऐवजी
घरच्या मंडईतील व्यवसायात लक्ष घालण्याचे ठरवले.त्याप्रमाणे ते नियमितपणे मंडईत
रोज सकाळी भल्या पहाटे उठून जाऊ लागले. बरोबर त्यांच्या कुटुंबाची देहूरोडजवळ शेती
आहे त्यातही आवडीने लक्ष घालू लागले.
हे करत असताना त्यांना त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्त्याचा पिंड शांत बसू देईना,
त्यामुळे त्यांना हळूहळू सामाजिक काम सुरू केले. कोणत्याही विषयात जनजागृती
करण्याचे काम ते करत आहेत, मग ते वाहतुकीचा प्रश्न असो की स्वाइन फ्लूचे संकट
असो की दहशतवादी हल्ल्याचा प्रसंग असो मिलिंद काची आणि त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर
जनजागृती करताना दिसतातच.
खरी सामाजिक जाणिव
काही वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता. त्यावेळी जनावरांसाठी सरकारने छावण्या सुरू केल्या होत्या. त्या छावण्यातील जनावरांना उसाचे पाचट बारीक तुकडे करून खायला घालत असत. त्यामुळे गाई, म्हशी, बैलांच्या तोंडाचे दोन्ही बाजूला काटेरी पाचटामुळे कापले जात होते, त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. यावर उपाय काय तर त्यांना मका खायला घालणे हाच होता. त्या जनावरांच्या तोंडाच्या जखमेच्या वेदना मिलिंद काची यांनां झाल्या. त्यामुळे त्यांनी आपल्या शेतात मका लावला आणि आठपंधरा दिवसात त्यांचे आलेले पीक
जनावरांना खाण्यासाठी दिले. हे सगळे मिलिंद काची यांनी केले ते प्रसिद्धीपासून दूर राहून. तो मका जनावरांना खायला घालणा-यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली पण त्यात काची दिसले नाहीत.
यावेळीही त्यांनी अशीच तयारी केली असून आपल्या बरोबर त्यांनी काही मित्रांनाही त्यांच्या शेतात गरज लागली तर जनावरांसाठी मका लावण्यास तयार केले आहे. यावेळी त्यांनी सुमारे शंभऱ एकरावर मका लावण्याची तयारी ठेवली आहे. पण यावेळी ते जमीन तयार करून थेट शेतक-यांनाच मका लावण्यासाठी देणार आहेत. आजकाल फॅशन आहे ती फ्लेक्स लावण्याची. कोणी तरी मिशी फुटलेला नवीन कार्यकर्ता गल्लीत तयार झालाय याची ओळख अनेकांना त्यांच्या फ्लेक्सवर झाळखलेल्या छबीतूनच होते. पण या अपवाद मिलिंद काची आहेत. त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. कधी प्रबोधन पुणेच्या नावाने तर कधी मिलिंद काची मित्र परिवारच्या नावाने तर कधी आलंग आळी गणेशोत्सव मंडळाच्या नावाने. प्रत्येक उपक्रम वेगळाच. बर त्याची महिती लिहून प्रसिद्धीसाठी पाठवणार पण नाही छापले तर कधी विचारणार नाही की का नाही छापली म्हणून. तुम्ही प्रसिद्धी द्या किंवा देऊ नका आम्ही आमचे काम करत रहाणार याच भावनेने ते काम करतात.
इतकच नाही तर मिलिंद काची यांनी आपण केलेल्या कामाचे फ्लेक्स कुठे झळकवले
नाहीत. त्यामुळे अनेकांना मिलिंद काची हे नावे महिती आहे पण व्यक्ती कोण सांगायचे तर जमणार नाही कारण त्यांना चेह-यापेक्षा नावानेच ओळखणा-यांची संख्या जास्त आहे. असे सातत्याने काम कऱणारा कार्यकर्ता शेवटी कोणत्या ना कोणत्या पक्षात दिसतोच. तसे मिलिंद काची हे स्वताःला शिवसेनेशी जवळीक असणारे मानतात कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे आवडते नेते. त्यांनी सांगितल्या प्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण करण्याचा मी प्रयत्न करतो असे काची आवडीने सांगतात.
राजकारणात का जात नाही किंवा गेला नाहीत असे विचारले तर त्यांचे उत्तर चोख आहे.
राजकारणात गेले तर तुम्हाला ज्या पक्षात जाल त्यांची बांधिलकी मानावी लागते. शिवाय
कोणतिही गोष्ट करायची म्हटले तर यांना विचारा त्यांना विचारा आणि शेवटी पक्ष सांगेत
तशीच करा अशी बांधिलकी येते. त्यामुळे आपण अधिकृतपणे कोणत्याही पक्षात जात
नाही किंवा जायचा विचारही नाही.
केवळ जनजागृती करणे इतकेच काम त्यांचे नाही तर वाहतुकीवर जनजागृती करणा-या
मंगेश तेंडुलकरांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्याचेही भान ते राखतात. कधी अंध शाळेतील मुलांना खाऊ दे...त्यांना ब्रेल लिपीत लिहिण्यासाठी पाच दहा हजार कागद ते सहजपणे देतात. अशा प्रकारच्या कामातून एक प्रकारचे समाधान मिळते असे ते जाहीरपणे सांगतात.
अशा प्रकारची कामे करत असताना ते दादा किंवा आऱआर अशी अक्षरे दिसणा-या फॅन्सी नंबरप्लेट असणा-या गाड्यांकडे माध्यमांचे लक्ष वेधतात. नुकताच त्यांनी एक गाडीच्या
नंबरप्लेटचा फोटो मोबाईल कॅमे-यावर काढला ती नंबरप्लेट लांबून आरआर अशी इंग्रजी अक्षरे लिहिल्यासारख्य दिसत होती. त्यामुळे त्या गाडीचा नेमका नंबर किती हे जवळ
जाऊनही लक्षात येइना पण कांचीनी तो शोधून काढलाच त्या गाडीचा नंबर होता 7212.
अशा प्रकारे जागृकता ते अधूनमधून दाखवत असतात.
रोज सकाळी मार्केट यार्डमध्ये गाळ्यावर जायचे दुपारी शेतावर जाऊन तिथली कामे
बघायची आणि उरलेल्या वेळात सामाजिक उपक्रम राबवायचे. आठवड्यातून एखादा दिवस
मुंबईत जाणे आणि नेत्यांना फक्त भेटणे. आजवर त्यांनी अनेकवेळा मातोश्रीवर भेट दिली
असेल पण त्यांच्या आपल्यासाठीच नाही तर अन्य कोणासाठी काहीही न मागण्याच्या
स्वभावामुळे त्यांना तेथे सहजप्रवेश आहे हे ते विसरत नाहीत. वर्षभर काही ना काही
सामाजिक उपक्रम राबवणे हे मिलिंद काची यांच्या जणूकाही रक्तात भिनले आहे.
आपल्या समाधानासाठी सामाजिक काम करण्याच्या वृत्तीने आज त्यांच्या भोवती काम
करण्यासाठी अडीचशे जणांचा संच तयार झाला आहे. कारण आपण हे करायचे पण
त्याला प्रसिद्धी मिळेल का?, त्याच फोटो छापून येईल का?, बातमी येईल का?,
चॅनेलवाले दाखवतील का? मग आपण जे करतोय त्याची बातमी होणार नसेल तर बातमी
येण्यासाठी काय करायचे किंवा काय केले म्हणजे त्याची बातमी होईल असा विचार हल्ली
कार्यकर्ते अगोदर करतात आणि मगच उपक्रम राबवतात. पण असल्या फालतू संकल्पनांना फाटा देत मिलिंद काची उपक्रम राबवतात व पुढेही असेच नवे नवे उपक्रम राबवणार आहेत. त्यामुळे पुण्यातील कार्यकर्ता म्हणजे संस्था आहे हे वाक्य त्यांनी जीवंत ठेवले आहे. सामाजिक कामात येऊ इच्छिणा-यांनी फ्लेक्सवरचा पुढारी म्हणून आपली ओळख करून द्यायची का मिलिंद काचीचे अनुकरण करत सामाजिक काम करत पुढे यायचे हे ठरवावे, कारण फ्लेक्सच्या जागी नवा फ्लेक्स लागली की जु्न्या फ्लेक्सवर काय होते हे लोक विसरतात. पण नवा उप्रकम राबवत असाल तर तुम्ही मागे काय उपक्रम राबवला होतात याची आठवण लोक आवर्जून करतात. त्यामुळे फ्लेक्स हा दिखावू आहे तर सामाजिक उपक्रम हे तुमची ओळख टिकवणारे आहेत हेच तर मिलिंद काची यांनी गेल्या काही वर्षात दाखवून दिलय !!!