Skip to content
जाहिरात

भिड्स्तपणा घालवण्यासाठी सेटॉरी उपयुक्त - डॉ. दिपाली लडकत

December 21, 2009

एक गृहस्थ थकवा आणि चक्कर येते म्हणून तपासणी करून घेण्यासाठी आले. चांगल्या पदावरची नोकरी, उत्तम आर्थिक परिस्थिती, मेहनती, कष्टाळू असे चांगले गुण त्यांच्यात होते. पण त्यांच्या हाताखाली जे काम करणारे होते त्या नोकर वर्गाच्या प्रभावामुळे ते गृहस्थ दबले जात असत. त्यामुळे सर्व कामांची जबाबदारी आपल्यावर घेत असत. त्यामुळे काम वाढायचे आणि रात्री जागून ते काम करत असत. रात्र रात्र जागरणाने जेवण व झोपेक़डे दुर्लक्ष झाले होते. सहाजिकरच त्यांच्या तब्बेतीवर परिणाम होऊ लागला होता. त्यांची तपसणी केल्यावर त्या अॅनिमिया व कमी रक्तदाबाचे दोष अढळून आले. अशा या भिडस्त व कामात तत्पर असणा-या गृहस्थांनी मी "सेंटॉरी" ही पुष्पऔषधी द्यायला सुरूवात केली.
केवळ पुष्पऔषधी देऊन भागणारे नव्हते. त्यामुळे औषधांबरोबर त्यांना आहार व जीवनशैलीत कसा बदल करायचा याचेही मार्गदर्शन केले. त्यांनीही सूचनांचे पालन केल्याने त्यांचा रक्तदाब व अॅनिमिया आटोक्यात आले. सेंटॉरी औषधाच्या प्रभावामुळे त्यांचा भिडस्त स्वभाव बदलू लागला व ते स्वतःसाठी जगायला शिकले.
भिडस्त स्वभावाच्या व्यक्तींना सेंटॉरी ह्या औषधाने फरक पडतो. दुस-यांच्या मताला बळी पडण्याच्या स्वभाव बदलतो, त्यांना त्यांच्या हक्कांचे भान येते. त्यांचे भिडस्त स्वभावाचे दोष नक्की दूर होतात. अशा व्यक्ती अहोरात्र कष्टच करत रहातात.पण इतरांना त्यांच्या कामाचे कौतुक नसते. इतकच नाही तर अनेकवेळा काम भिडस्त स्वभावाची व्यक्ती करते आणि त्या कामावर दुसराच भाव खाऊन जातो.
अशा स्वभावाच्या माणसांना अनेक वेळा केवळ काम करून घेण्यासाठी जवळ केले जाते. अशा भिडस्त स्वभावाच्या व्यक्ती आपल्याला आपल्या अवतीभवती सहजपणे दिसतात. अगदी सरकारी कार्यालयांपासून ते कंपन्यांपर्यंत सर्वत्र अशा व्यक्ती अढळतात. त्यांच्याकडून कामेही तशाच पद्धतीने करून घेतली जातात. या भिडस्त व्यक्ती अगदी थेट पु. ल. च्या नारायणासारख्याच राबतात पण त्यांचा नारायण ही कामे आवडीने करताना दिसतो. इथे मात्र काम आवडो वा ना आवडो भिडस्त स्वभावाच्या व्यक्ती ती कामे करतानाच दिसतात. अशा व्यक्तींचे आरोग्य सुधारण्यासाठी सेंटॉरी नक्की उपयुक्त आहे.
सेंटॉरीचे झुडूप असते.साधारण जमिनीपासून ते दीड फूटापर्यंत वाढते. त्याला गुलाबी रंगांची चांदण्यांच्या आकाराची फुले येतात. कोणत्याही खराब जमिनीत किंवा रस्त्याच्या कडेला सेंटॉरीचे झुडूप येते. जून ते ऑगस्ट दरम्यान याला फुले येतात.
महत्वाची लक्षणे
- स्वताःचे मत नसणे, त्यामुळे दुस-यांच्या प्रभावाखाली जगतात.
- अॅनिमीया व रक्तदाबचे आजार त्यांच्यात अढळून येतात.
- शांत स्वभाव, लाजाळू व दुबळे व्यक्तीमत्व
- भिडस्त स्वभाव, कोणापुढे सहज नमणारे त्यामुळे कामात तत्पर
- दुस-यांचा वरचष्मा सहन करण्याची वृत्ती
- इतरांची कामे, सेवा करता यावी म्हणून प्रसंगी स्वताःच्या सुखाचा त्याग सहजपणे करतात.
हे सुद्धा लक्षात घेतल पाहिजे..
पुष्पऔषधी ही लक्षण साधर्म्यावरून दिली जातात. गोळ्या किंवा अर्काच्या स्वरूपात ही औषधे उपलब्ध असून त्यांच्या सेवनाचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही हे जरी धरे असल तरी केवळ लक्षणांच्या सारखेपणा वाटल्याने रूग्णांनी ही कोणतिही औषधे परस्पर घेतल्याने उपचाराची दिशा बदलण्याची शक्यता असते म्हणून पुष्पऔषधी या तज्ञांच्या सल्ल्यनुसारच घ्यावीत.

http://www.enewspune.com/files/1%20-1.jpg
डॉ. दिपाली लडकत
919422016830
dipali.ladkat@yahoo.com

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.