Skip to content
जाहिरात

गुरू बदल कोणत्या राशीला कसा आहे हे सांगताहेत डॉ.अग्निहोत्री

December 21, 2009

ग्रहमालेतील गुरू हा ग्रह अतिशय महत्वाचा मानला जातो. ज्ञान, संपन्नता, सौख्य, संतती देणारा हा ग्रह जेव्हा रास बदलतो तेव्हा या शुभ ग्रहाची आपल्या वाट्याला नेमकी कोणती फळे येणार याची उत्सुकता सर्वांनाच असते. नुकताच गुरूने कुंभ राशीत पवेश केला आहे. तो 2 मे 2010 या दिवशी अतीचार गतीने मीन राशीत प्रवेश करेल. पुढे नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात तो पुन्हा वक्री होऊन कुंभ राशीत रहाणार आहे. त्यामुळे या नुकत्याच झालेल्या गुरू बदलाची फळे कोणासा कशी मिळणार ते पाहू.
सामाजिक दृष्ट्या विचार करता अतीचार गतीचा गुरू गुरूच्याच कारकत्वाची हानी करणारा रहातो. महागईचे प्रमाण वाढणार आहे. सोन्यांच्या किंमती वाढत रहातील. चैनिच्या वस्तू महाग होतील.हवामानात होणारे बदल मानवाला मानवणारे नाहीत. विरोधीपक्षातील एखाद्या मोठ्या नेत्याचा या काळात मृत्यू संभवतो. मात्र कलावंत, खेळाडू, लेखक यांनी गुरूची चांगली फळे मिळतील. उद्योगातील मंदीचे सावट दूर होऊन शेअर माकेटमध्ये तेजी वाढल्याने गुंतवणूक वाढेल. आर्थिक संस्थातील गुन्हे उघडकीस येतील.
राशीप्रमाणे मिळणारी गुरूची फळे....
मेष - या राशील गुरूची सर्वोत्तम फले मिळताल. वाहन प्राप्ती, उत्पन्नात वाढ होईल.आतापर्यंत तुम्ही जे जे पेरल असाल ते उगवण्याचा काळ आहे.गेल्या दहा वर्षात केलेले अवलोकन फळाला येणार आहे.चांगली अर्थप्राप्ती होऊन बढतीचे योग आहेत.कौटुंबिक सुख समाधन मिळेल. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. पुत्रप्राप्ती होइल. यश मानसन्मान मिळेल. राशीचक्रातील हसरी रास म्हणून या राशीचा उल्लेख करता येइल.
वृषभ - खर्च वाढतील. व्यावसायासाठी कर्ज काढावे लागेल. जबाबदारी वाढेल. भरपूर कष्ट करावे लागतील. राशीला दहावा गुरू आला असून राशीच्या लोकांना स्वताःला अपग्रेड करावे लागेल. मानहानीचे प्रसंग येऊन अपयशाला सामोरे जावे लागेल. संसतीकडे लक्ष द्या.
मिथुन - या राशीला सुरू असलेली मिनी साडेसाती गुरूमुळे सुखावह होणार आहे. भाग्यवृद्धीचे योग आहेत.धेय्य प्राप्तीच्या अनेक संधी येतील. पदव्या, पुरस्कार मिळतील. विद्यार्थी वर्गाची अभ्यासात प्रगती होईल. सुख समाधान मिळेल, सत्संग व सत्कार्य कराल.
कर्क - राशीला गुरू आठवा आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. कोणावरही पटकन विश्वास ठेऊ नये. प्रवाहाविरूद्ध पोहणे योग्य होणार नाही. शिस्तीने वागणे हिताचे ठरेल.वेळ संभाळा, जास्त कष्ट पडतील.धननाश होऊ शकतो. कौटुंबिक वाद टोकाला जातील.एकलकोंडेपणा वाढेल. रोज मेल्यासारखे आयुष्य जगायला लागू नये म्हणून उपासना करा. मदतीशिवाय जगायला शिकावं लागेल. कमी श्रमात लाभ होण्याची शक्यता असून वडिलोपार्जीत प्रॉपर्टीतून पैसा मिळेल.
सिंह - सातवा गुरू असून वैवाहिक सौख्य मिळेल.त्यामुळे समाधान मिळेल. विवाह ठरतील. धनलाभ होतील. आतापर्यंत केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. वाहन खरेदी कराल. पुत्रलाभाचे योग. मानसन्मान मिळतील. कोर्टकचे-यात यश. भागिदारी व्यावसायात सामंजस्याने प्रश्न सुटतील. आरोग्य सुधारेल.
कन्या - सहाव्या गुरूमुळे परिणाम प्रतिकूल रहातील. खर्चात वाढ होईल. आरोग्य संभाळावे लागेल.हितशत्रूंचा त्रास जाणवेल. महत्वाच्या कामात विलंब, संघर्ष, अढथळे येऊ शकतात. वितुष्ट येऊ शकते. कशाची ना कशाची चिंता राहिल आणि त्यातून भय निर्माण होईल. यशासाठी खूप प्रय़त्न करावे लागतील.
तूळ - पाचव्या गुरूमुळे संतती सौख्य मनासारखे मिळेल. पुत्रप्राप्तीचे योग. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायात भरभराट होऊन भाग्य उजळेल.सरकार दरबारी मानसन्मान मिळतील. वरिष्ठांकडून प्रशंसा ऐकायला मिळेल. कुटुंबात मंगल कार्ये ठरतील. कोणत्याही बाबतीत तडजोड करणार नाही. शेअर मार्केटमध्ये फायदा होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रेम विवाहास अनुकूल काळ. अनेक दृष्टीने शुभ फळे मिळतील.
वृश्चिक - चौथ्या गुरूमुळे कष्ट वाढतील. अपेक्षाभंगाचे दुःख सहन करावे लागेल. खर्च वाढतील. आप्तेष्टांचे वियोग होण्याची शक्यता.कौटुंबिक त्रास झाल्यामुळे असमाधानी वृत्ती राहील. स्वतःला अपग्रेड करण्याची आवश्यकता राहिल. नोकरीत प्रमोशन मिळेल. स्वतःची वास्तू होण्याचे योग, कर्जमुक्तीचे योग.
धनू - तिस-या गुरूमुळे लेखक, साहित्यिक, कलाकार, खेळाडू यांना मोठे यश मिळेल. नको तेथे खर्च होण्याची शक्यता आहे. य़श मिळण्यासाठी भरपूर कष्ट करावे लागतील. प्रकृतीला संभाळा. प्रवास कष्टदायी होऊ शकतो.हातून धार्मिक कार्ये होतील. भावंडे आणि नातावाईकांचे प्रश्न सुटतील. कधी न झालेल्या आजारांमुळे अस्वस्थपणा जाणवेल. कलाकार खेळाडूंना यश मिळेल.
मकर - दुसरा गुरू धनलाभाची सुरूवात करून देईल. घरात मंगल कार्ये ठरतील. कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. आवश्यक तेथे गुंतवणूक कराल. हाती घ्याल ते तडिला न्याल. अधिकार व मान प्राप्ती होईल. प्रमोशन मिळेल. व्यवसायात भरभराट होणार असल्यामुळे आतापासून कामाला लागा. मोठी स्वन्प पहा आणि वास्तवात कामाला लागा. स्वताःच्या पूर्व कर्माने पुढे जाल कुठेही विरोध रहाणार नाही.
कुंभ - गुरू याच राशीत आला आहे. अशावेळी चांगला बदल अपेक्षित आहे.दगदग मात्र वाढेल. मन प्रसन्न राहिल. लोकप्रियता वाढून प्रसिद्धी मिळेल. धार्मिकतेकडे ओढा जास्त राहिल.जीवनाचे सूत्र सापडेल. स्वकर्माच्या धनात मात्र वाढ होणार नाही.स्थलांतरात अडथळे येऊ शकतात. हातून चांगली कामे होतील.
मीन - राशीला बारावा गुरू आहे. जोडीदाराचे ऐकल्यास फायद्याचे ठरेल. स्वतःला हसायला शिकवा. प्रचंड खर्च होतील. त्यामुळे पैशाची तोंडमिळवणी करताना नाकी दम येईल. स्थावरसंबंधी चिंता उत्पन्न होतील. बदनामी होणार नाही याची काळजी घ्या.मित्रांमुळे नुकसान संभवते. परदेश गमनाचे योग आहेत. मंगलकार्य, दानधर्म यात पैसा खर्च होईल. प्रकृत संभाळा.
गुरूबदल थोडक्यात.....
मकरेच्या लोकांनी पेरायला सुरूवात करावी.
तूळेच्या लोकांनी मशागत सुरू करावी.
सिंहेच्या लोकांनी बी पेरावे.
मिथुनेच्या लोकांनी खतपाणी घालावे.
गुरूचे भ्रमण हर्षलसारख्या चळवळ्या विक्षिप्त ग्रहाबरोबर रहाणार आहे. त्यामुळे संततीबाबत जागरूक रहावे लागेल. त्यासंबंधी ताणतणाव वाढतील. कोणतिही गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्यावा.
हे गुरू संक्रमण कुंभेत म्हणजे बौद्धीक राशीतून होत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील वाद, घोटाळे बाहेर येतील. अन्यायकारक आणि चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले तर बडतर्फ होण्याची शक्यत आहे.कुंभेतील गुरूचा धावता प्रवास सर्वांना मुख्य प्रवाहात नेणारआहे. य़श डोक्यात जाऊ द्यायचे नाही. ज्यांचे पाय जमिनीव आहेत त्यांची तो भरभराट करणार आहे. मकर, मेष, मिथुन, तुळ, कुंभ, सिंह यांना गुरूची अनुकूल फळे मिळणार आहेत. कमी श्रमात मोठे यश मिळेत. वृषभ, धनू राशीला संमिश्र फळे मिळतील.
एकंदर पहाता कन्या राशीला जास्त प्रतिकूलता जाणवेल. त्या शिवाय मीन, वृश्चिक,कर्क राशीला गुरू भ्रमण प्रतिकूल आहे.या व्यक्तींनी ओम बृं बृहस्पतयेनमः हा जप ऐकोणीस हजारवेळा करावा.

- डॉ. शिल्पा अग्निहोत्री
121 शनिवारपेठ, नेने घाट पुणे - 30.
संपर्क (+91020) 24457889 किंवा 9823322117