Skip to content
जाहिरात

नोकरी देता का कोणी नोकरी....

August 26, 2009

khaugalli pune

पुणे - आजकाल नोक-या मिळेनाशा झाल्यात...पण पंधरा वर्षाँपूर्वी अशी स्थिती नव्हती तरीही त्याला कोणी नोकरीला लावले नाही....तशात जी नोकरी होती त्यात ब्रेक मिळालेला...म्हणजे फ्रस्ट्रेशनची अवस्था...पण त्याने धीर सोडली नाही. नोकरी देता का कोणी नोकरी...असे म्हणणे सोडले आणि घराच्या खाली खाद्यपदार्थांचा स्टाँल सुरू केला.

बघता बघता त्याला यश मिळाले आणि काही वर्षाँपूर्वी नोकरी मागणा-या त्या तरूणाने आज तीन तरूणांना तेथेच रोजगार दिला आहे. मंडई शनिपार रस्त्यावरील जिलब्या मारूती मंदिराच्या शेजारी रोज सकाळी खवय्यांची दिसणारी गर्दी दिसते ती असते मकरंद माणकीकरच्या स्टाँलवर. आता त्याला जागही कशी मिळाली तर चक्क मिष्टन्नाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मारूतीच्या शेजारच. मकरंदने दाण्याचे लाडू आणि चकली या अस्सल मराठी पदार्थाँपासून सुरूवात केली. सुरवातीला दोन
रूपये धंदा होत नव्हाता, त्यावेळी त्याला त्याची आई मंगला, संगीता व कल्पना या बहिणी आणि पत्नी वैशाली यांनी धीर दिला. आज त्याच सर्व त्याच्या स्टाँलच्या खाद्यापदार्थ बनवण्याचे काम करत आहेत. खिशात एकही पैसा नसताना बिनभांडवली धंदा त्याने सुरू केला, 27 सप्टेंबर 2000 साली. रोज सकाळी तीन वाजता मंकरंदचा दिवस सुरू होतो. तर घरातल्यांचा साडेचार वाजता.घरातील महिला मंडळ गरमागरम शिरा, उपीठ, पँटिस, वडे असे लज्जतदार पदार्थ बनवतात. पँटिसमधील भाजी किंवा कचोरीतील सारण किंवा खिचडी हे मात्र मकरंद स्वत: हाताने बनवतो.
सकाळी सहा वाजता स्टाँल उघडण्यापूर्वीच खवैय्यांची गर्दी खाली सुरू झालेली असते. उपवासाची मिसळ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, दाण्याची आमटी, काकडीची कोशिंबीर आणि बटाट्याचा चिवडा यांची केलेली मिसळ तेथे मिळते. या शिवाय थालपीठ, लोणी आणि ठेचा या डिशलाही खवैय्या पुणेकरांनी पसंती दिली आहे.मंत्री, आमदार, नगरसेवक, पुढा-यांपासून ते अनेक मान्यवरांपर्यंत हे मकरंदच्या खाद्य पदार्थांची चव वरचेवर घेत असतात. चांगल्या तेल तुपात बनवलेल्या पदार्थांमुळे त्रास होत नाही याची त्यांच्या ग्राहकांनाच खात्री आहे. त्यामुळे आपणही एकदा मकरंदच्या स्टाँलला
भेट द्यायला काय हरकत आहे! पण त्यासाठी सकाळी सहा ते दहा या वेळातच पुण्यातील जिलब्या मारूती जवळ यावे लागेल!!अर्थात अस काही करायचे म्हटले तर शेजारी चांगले असावे लागतात ते त्याला जिलब्या मारूती मंडळाचे कार्यकर्ते आणि स्ट्रस्टींच्या रूपाने मिळाले आहेत. तसेच सुरूवातीच्या काळात जेव्हा एक पैशाची विक्री होत नसे त्यावेळी नाना कुलकर्णी त्याच्याकडे येत असत आणि सर्व माल घेऊन खिशात हात घालून हातात येतील तितके पैसे त्याला देत असता.

अशा शुभेच्छांच्या जोरावर मकरंद वाटचाल करतोय, त्याल प्रोत्साहन देण्यासाठी एकदा थालपीठ...उपवासाची मिसळ खायला काहीच हरकत नाही.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.