

पुणे, दि. ३ (प्रतिनिधी) - आपण भाजपचेच असून पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेली नाही,त्यामुळे आपल्याला पक्षातून काढूच शकत नाहीत. मला जर काढले तर लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांना पाडणा-यांनाही पक्षातून काढावे लागेल अगदी ते उमेदवार असले तरी असे रोखठोख प्रतिपादन केसकर यांनी ईन्यूज शी बोलताना केले.
ते म्हणाले, कोथरूडमध्ये भाजपचा उमेदवार नाही. त्यामुळे मी पक्षाच्या विरोधात बंडखोरी केलेली नाही. मी भाजपच्या विचारांशी प्रामाणिक आहे. तसेच मला माझ्या उमेदवारी बद्दल कोणीही नेत्याने काहीच सांगितले नाही त्यामुळे माझ्यावर कारवाई होऊच शकत नाही. मला जर पक्षातून काढायचे असेल त्यासाठी मला कारणे दाखवा नोटिस द्यावी लागेल. ती अद्याप दिलेली नाही. त्यावर मी माझा खुलासा उत्तर म्हणून देईन तो पटला नाही तर ते मला काढू शकतात.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रामाणिक, सदाचारी, सदवर्तनी, भ्रष्टाचार न करणार असा उमेदवार अनिल शिरोळे यांच्या रुपाने दिले होता. त्यांना पाडण्यासाठी पक्षातील अनेकांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रयत्न केले आहेत. त्यांनीतर थेटच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेले असल्याने जर मला काढले तर त्यांनाही पक्षातून काढावेच लागेल. अगदी जरी त्यांच्यापैकी कोणी उमेदवार असले तरी, असे केसकर यांनी स्पष्ट केले.
ही निवडणूक मी माझ्या अजेंड्यावर लढवत आहे असे सांगून ते म्हणाले, निवडणूक लढवण्यासाठी मी पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रम वापरत नाही. गेल्या काही वर्षात मी येथे केलेल्या कामाच्या जोरावरच ही निवडणूक लढवत आहे. त्या कामांमुळेच मला अनेक ठिकाणी कार्यकर्ते मिळाले आहेत.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या