

पुणे, दि. 3 (प्रतिनिधी) - पुण्यातील ऐतिहासिक केसरी वाडा अनेक घटनांचा, चळवळींचा साक्षिदार आहे. लोकमान्य टिळकांपासून या वाड्याला कार्यकर्ते बघण्याची सवय होती. मध्यंतरीच्या काही वर्षात ही वाड्यावरची कार्यकर्त्यांची लगबग काहीशी खंडावली होती पण विधानसभा निवडणुकीची उमेदवारी लोकमान्यांचे खापर पणतू रोहित टिळकांना मिळाली आणि केसरी वाडा पुन्हा एकदा कार्यकर्त्यांनी गजबजून गेला आहे.
लोकमान्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चळवळ उभी केली. त्यासाठी लोकजागृती करण्यासाठी केसरी वर्तमानपत्र सुरू केले ते याच वाड्यातून. त्यामुळे हा केसरी वाडा म्हणून लोक म्हणू लागले. पुढे जाग आलेल्या समाजाला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. या चळवळींची सुरूवात याच वाड्यातून झाली.
लोकमान्यांच्या निधनानंतरही केसरी सुरूच राहिला पण राजकारणात त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणी आले नाही. पुढे लोकमान्यांचे नातू असलेले स्व. जयंतराव टिळक हे राजकारणात सक्रीय झाल्यावर पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची येजा वाड्यावर सुरू झाली. त्यांनी गोवा मुक्ती संघ्राम, संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन कार्यकर्त्यांना बळ दिल्याने येणा-यांची संख्या वाढू लागली. पुढे ते राजकारणात सक्रीय झाल्यावर विविध पद त्यांना काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिली. तसेच केंद्रातील व राज्यातील मंत्रीपदही त्यांना मिळाल्याने त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग काँग्रेसमध्ये तयार झाला.
ते तेरा वर्षे सलग विधानपरिषदेचे सभापती राहिले. त्यावेळी तर काँग्रेसचे राजकारण त्यांच्याच केबिनमधून चालत असल्याचे सांगणारे मंत्रालयात भेटतात. जयंतरावांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव डाॅ. दीपक टिळक हे काही काळ राजकारणात राहिले पण ते तेथे रमले नाहीत. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, केसरी आणि जयंतरावांनी सुरू केलेल्या अन्य संस्थांचे काम करणे पसंत केले. आजही ते या संस्थांचा कार्यभार संभाळत आहेत.
अशी ही मोठी परंपरा लाभलेल्या कुटुंबातील पाचवी पिढी म्हणजे रोहित टिळक. ते डाॅ. दीपक टिळक यांचे चिरंजीव, जयंतरावांचे नातू आणि लोकमान्यांचे खापर पणतू. आज काँग्रेसचे उमेदवार असून त्यांना थेट राहुल गांधी यांचे उमेदवार म्हणून आेळखले जातात. त्यांनी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून कामाला सुरूवात केली. पुढे त्यांची आेळख नेत्यांशी टिळकांचे खापरपणतू म्हणून करून देण्यात येत असल्याने त्यांना काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी हेरले आणि नॅशनल स्टुडंटस युनियन आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष केले. तेव्हापासून राजकारणात आणि काँग्रेसमध्ये टिळक - गांधी एकत्र काम करत आहेत.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या