Skip to content
जाहिरात

सत्तेसाठी लोटांगण....पुण्यात दादा गेले भाईंच्या घरी

October 3, 2009

पुणे, दि. ३ (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची धूम सुरू आहे. त्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असून आता तरी प्रचारासाठी खासदार सुरेश भाई आणि अजितदादा एकत्र येणार का ? अशी शंका आज दूर झाली. दुपारी भोजन समयी दादा हे चक्क भाईंच्या धरी गेले.

तेथे दोघांनी एकमेकांना आम्रखंड भरवून मतभेत संपवले.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीपासून या दादा-भाईंचे वैर होते. कारण दादांनी महापालिकेच्या सत्तेत भाईंना सहभागी करून घेण्याऐवजी सेनाभाजपला घेतले. तेव्हापासून त्यांच्यात ठिणगी पडली. तेव्हापासून दोघेही एकमेकांच्या अपमान करण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच करमणूक झाली.
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत दादांनी अगदी उघडपणे भाईंना पाडण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी दोन्ही पक्षांची आघाडी असूनही आपल्या पक्षांचे कार्यकर्ते प्रचारापासून दूरच ठेवले. त्यामुळे मोठ्या साहेब गडबडले. त्यांनी मी माढातून माघार घेतो आणि पुण्यात येऊन गल्लोगल्लीत फिरून मत मागतो असे भावनिक आव्हान करावे लागले तरी दादांनी त्यांचा हट्ट सोडला नाही आणि ते भाईंच्या प्रचारात उतरले नाही. इतका विरोधी प्रचार दादांनी करूनही भाई निवडून आलेच.
हा इतिहास जुना होण्या आगोदरच विधानसभेच्या निवडणुका आल्या. त्यात जागा वाटप, तिकीट वाटप झाले. पण हे दोघे एकत्र येण्याची चिन्हं दिसेनात. त्यात भाईंनी ते दोघे एकत्र येत असल्याचे मागच्याच आठवड्यात जाहीर केले. अखेर आज दुपारी दादांची गाडी केतकर रोडवरील कलमाडी हाऊस जवळ थांबली आणि त्यातून दादाच उतरले.
दादांच्यासाठी खास बेत भाईंनी केला होता. दोघांनी एकमेकांना आम्रखंड भरवून भांडण संपवल्याचे जाहीर केले. ही दोस्ती वाढायला हवी, त्यासाठी तिखट मीठ लावालया हवे. त्यासाठी खास फिश केले होते ते एकमेकांना भरवून दोस्ती किमान सध्यातरी तुटायची नाय असा संदेश दिला. तसेच पुढे पुणे पॅटर्नची पुनरावृत्ती कोणत्याही परिस्थितीत नाही असे दादांनी जाहीर केले. त्याला हसतहसत भाईंनी प्रतिसाद दिला.
यावेळी आघाडी आणि युती यांनी समान संधी सत्तेची आहे. त्यामुळे सत्ता हातची जाऊ नये यासाठी राज्यात दोन्ही काँग्रेसने आघाडी केली आहे. त्यात तिकीट वाटपावरून बंडखोरी झाली ती शमवण्याची ताकद दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये दिसली नाही. बंडखोरी शमवता आली नाही म्हणून नेत्यांनी आपापसातील भांडणे मिटवण्याची भूमीका घेतली आहे. त्यामुळे सत्तेसाठी सार काही म्हणून पुण्यात दादा - भाई आता या निवडणुकीत एकत्र आले आहेत.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या