

पुणे, दि. 15 (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूकीत प्रचारात न दिसलेले खासदार
सुरेश कलमाडी यांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्कच बजावला नाही. मात्र त्यांनी
सर्व कॅम्पेन दिल्लीहून कंट्रोल केली. त्यांनी मतदान केले नसेल पण पुढील वर्षीच्या राष्ट्रकूल स्पर्धी देशातच राखण्यात यश मिळवले आहे.
या निवडणुकीत खासदार सुरेश कलमाडी मोठा रोल करणार अशी दाट शक्यता होती.
त्याप्रमाणे त्यांनी एक रोल करून दादांशी सलगी केली व त्या निमित्त दोघांच्या कुटुंबियांनी
एकत्र प्रिती भोजन केले. त्यानंतर मात्र कलमाडी प्रचारात कुठेच दिसले नाहीत. फक्त
राहुल गांधी यांच्या सभेत ते उपस्थित होते.
पुढील वर्षी आपल्याकडे होणा-या राष्ट्रकूल स्पर्धा या सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडला
हलवण्याच्या हलचाली सुरू होत्या. त्यामुळे राष्ट्रकूल स्पर्धेचे अध्यक्ष मायकेल फेनेल व
त्यांचे मोठे शिष्टमंडळ याच िनवडणूक प्रचाराच्या काळात दिल्लीत आले होते. त्यांना
पटवण्याचे काम 2010 च्या स्पर्धेचे अध्यक्ष या नात्याने खासदार कलमाडी यांना करणे
गरजेचे होते. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या काळात ते पूर्णवेळ दिल्लीत या स्पर्धा
देशाबाहेर जाऊ नये यासाठी प्रय़त्न करत होते.
मतदानापर्यंत तरी ही बोलणी संपतील अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती पण ती फोलच
ठरली. कारण मतदानाच्य दिवशीच झालेल्या फायनल राऊंडमध्ये स्पर्धा देशातच होणार
असल्याचा निर्णय झाला. त्यामुळे त्या दिवशी कलमाडी यांच्या कुटुंबियांनी मतदानाचा
हक्क एसएनडीटी केंद्रावर बजावला पण कलमाडी त्यासाठी येऊच शकले नाहीत.
राजकारणात वेळेला महत्व असल्याने त्यांनी निवडणुकांची धूम सुरू झाल्यावर लगेचच
दादांशी समझोता करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर दोन दिवसात त्यांनी एकत्र प्रिती
भोजन घेतले आणि कलमाडी निर्धास्तपणे दिल्लीला मिटिंगसाठी गेले. त्यानंतर संपूर्ण
कॅम्पेन कलमाडी यांनी दिल्लीहून कंट्रोल केली. रोज सकाळी व रात्री ते प्रचाराची महिती
घेत होते तसेच योग्य त्या सूचनाही करत होते. काहीही करा पण आघाडीचे सर्व उमेदवार
निवडून आणा असे आदेशच त्यांनी समर्थकांना दिले होते.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या