

पुणे, दि. 30 (प्रतिनिधी) - सरकारी स्वाइन फ्लूच्या सावटाखाली सुरू असलेल्या गणेशोत्सवात आज अखेर पुणेकर आणि परगावचे लोक श्रींच्या दर्शनाला घराबाहेर पडले. पहाटेपासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी असलेली रांग रात्री पर्यंत होती. यागर्दीने उत्सवात चैतन्य पसरले असून आज दिवसभरात गणेशोत्सवाचा राजा असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे सुमारे 25 लाख भाविकांनी दर्शन घेतले. तसेच सुमारे साडेतीन लाख नारळ अपर्ण करण्यात आले.
हा गणेशोत्सव सरू होण्यापूर्वीपासून स्वाइन फ्लू आहे अशी दहशत पसरवणयात आली होती. त्यासाठी प्रशासनाने सर्व मार्ग वापरले. परिणामी गणेशोत्सव सुरू झाला तो तुरळक गर्दीनेच. त्यात साधेपणाने उत्सव साजरा करा अशी बोंब मारण्यात आली होती. उत्सव हवा गर्दी नको अशीही भूमीका मांडण्यात आली. ज्या मंड़ळांनी याला प्रतिसाद दिला त्यांना वारेमाप प्रसिद्धी देणयात आली. उत्सव असूनही पुणेकर कसे घरातच आहेत असे चित्र रंगवण्यात आले होते. देखावे नाहीत सजावटी नाहीत त्यामुळे यंदा पुण्यात बघण्यासारखे काही नाही असे भासवण्यात आले.
हा सर्व मारा होऊनही आज अखेर पुणेकर दर्शनाच्या निमित्ताने घराबाहेर पडले. दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई मंडळाचे शारदा गजाजन,ग्रामदेवता कसबा गणपती, ग्रामदेवता जोगेश्वरी अशा गणपतींचे दर्शन घेणा-या भाविकांची संख्या मोठी आहे. त्याच प्रमाणे गणेशोत्सवात खास पुण्यात येणा-या परगावच्या भाविकांचीही संख्या मोठी आहे. अशा सर्व भाविकांनी आज पहाटे पाच पासून दर्शनासाठी गर्दी केली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर पहाटे पासून सुरू झालेल्या पूजा दुपारी चारपर्यंत सुरू होत्या. पहाटेपासून सुरू झालेल्या या दर्शनबारीतून मध्यरात्रापर्यंत सुमारे 25 लाख भाविकांनी दर्शन घेतले आहे असे ट्रस्टचे सरचिटणीस अशोक गोडसे यांनी सांगितले. ते म्हणाले या गणराया नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. सुमारे 350000 नारळ आज अर्पण करण्यात आले. यंदाच्या उत्सवातील हा विक्रम आहे. त्याच बरोबर अनेक मान्यवरांनी गणेश महालात येऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यात ऊर्जा मंत्री सुनील तटकरे, वित्तमंत्री दिलीप वळसे पाटील, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अभिनेते प्रसाद आेक , त्यांची पत्नी, न्यायालयांचे न्यायाधीश, धर्मदाय आयुक्त, रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
या परिसरात नारळ, फुलांचे स्टाॅल लावणा-यांची संख्या मोठी आहे. स्वाइन फ्लूवर मात करून भाविक बाहेर पडले अशी प्रतिक्रिया विक्रेते निखील शहा यांनी दिली. त्यांचे दुकान या चैाकात 1935 पासून असून ते गेली पाच वर्षे नारळचा व्यावसाय करत आहेत. यंदाच्या उत्सवात आम्ही हाताची घडी घालून बसलो होतो, पण आज दरवर्षी होणा-या गर्दी्च्या 75 टक्के गर्दी आज झाली,असेही त्यांनी सांगितले.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या