Skip to content
जाहिरात

दगडूशेठ गणपतीच्या सूर्यरथाची रोषणाई लक्ष्मी रोडवर बंद

September 1, 2009

पुणे, दि. 1 (प्रतिनिधी) - स्वाइन फ्लूचा प्रार्दूभाव कमी झालेला असला तरी त्याबद्दलची भिती कमी झालेली नाही.त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतील संभाव्य धोका लक्षात घेऊन श्रींमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने लवााजमा कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी मिरवणुकीत सूर्य रथाची विद्यूत रोषणाई लक्ष्मी रोडवर बद ठेवण्याचा निर्णय ट्रस्टचे अध्यक्ष प्रथापराव गोडसे यांनी काल जाहीर केला आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी खास सूर्य रथ तयार करण्यात आला होता. त्यावर दोन मोर व नक्षीकाम केलेले खांब होते. याला सुमारे अडीच लाख रंगीबेरंगी एलइडी बल्ब लावण्यात आले आहेत. या विद्यूत रोषणाईचे उदघाटन परिमंडळ एकचे उपायुक्त ज्ञानेश्वर फडतरे व शोभा फडतरे यांनी केले. त्यावेळी गोडसे यांनी रोषणाई बंद ठेवणार असल्याची घोषणा केली.
हे सर्व एलइडी बल्ब मुंबईसह चेन्नई, सुरत अशा वेगवेगळ्या मार्केटमधून शाम वाईकर व मुकुंद वाईकर यांनी आणले आहेत. हे पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीच्या रथाला वापरण्यात येत असून रथाचे डिझाइन विवेक खटावकर यांनी केले आहे. तीन महिने हे काम चालले होते.
सध्या या रथाची रोषणाई बघण्यासाठी सारस बागेसमोरील सजावट विभागात सुरू ठेवण्यात येणार आहे. तसेच विसर्जन मिरवणुकीच्या दिवशीही मंदिराजवळ दोन तास ही राषणाई बघता येईल. त्यानंतर मिरवणूक सुरू झाल्यावर ती बंद करण्यात येणार आहे. मिरवणुकीत श्रींच्या मूर्तीवर प्रकाश झोत टाकण्यात येणार आहेत.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.