

पुणे, दि. 1 (प्रतिनिधी) - यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता गुरूवारी होणार आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैभव असलेला विसर्जन सोहळ्यावरही स्वाइन फ्लूचे सावट असल्याने तो कसा होणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी रस्त्यांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी पथके कमी करा, गुलाल उधळू नका, तसेच या मिरवणुकीत सामील होणा-या नटनट्यांनाही बंदी घालण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गुलाल व पथकांबाबत करण्यात आलेले आवाहन अनेक मंडळांनी मान्य केले आहे.
वैभवशाली विसर्जन सोहळ्यास गुरूवारी सकाळी दहा वाजता सुरूवात होणार आहे. पुण्याच्या प्रथम नागरीकांच्या हस्ते मानाच्या गणपतींचे पूजन करून या सोहळ्याची सुरूवात होते. पण निवडणुक आचार संहिता असल्याने प्रथम नागरीक राजलक्ष्मी भोसले येणार का नाही याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. त्याच प्रमाणे कोण पुढारी मंडळी सहभागी होणार याबद्दल उत्सुकता आहे.
रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी मिरवणुकीत जादा पथके ठेवू नयेत तसेच गुलाला उधळू नये असे आवाहन पवार यांनी केले होते. त्याप्रमाणे मानाच्या सर्व गणपती मंडळांनी पथकांची संख्या कमी केली आहे. मानाच तिसरा गणपती गुरूजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीपासून खरे तर यात रंग भरले जातात.मुक्त हस्ते गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या कडकडाटात हा गणपती मुख्य मिरवणुकीत सामील होतो. पण यंदा गुलाल न उधळण्याचे मंडळाने मान्य केले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी पर्यंत येणारे चैतन्य यंदा येणार नाही.
या मिरवणुकीत अनेक मराठी - हिंदी चित्रपटातीन नटनट्या येऊन गर्दी जमवतात. त्यांनाही सहभागी न होण्याचे आव्हान करण्यात आले आहे. तसेच ही मिरवणूक बारा तासात संपवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या