Skip to content
जाहिरात

रंगकर्मींनी अभिनय न करता खेळाने मैदाना गाजवले

October 27, 2009

पुणे, दि. 27 (प्रतिनिधी) - दिवाळी सरली अन केवळ रंगकर्मीच नाहीतर पडद्यामागचे कलाकार हे हातात बॅट घेऊन मैदानावर उतरले होते, हापपीच टेनिस बाॅल स्पर्धेत.त्यात लाइटमन-साऊंडचे काम करणा-यांच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे. सर्वच संघातील खेळाडू अभिनायशी जवळून संबंध असणारे होते. मात्र त्यांनी टीम इंडिया सारखा अभिनय न करता चक्क खेळाने मैदान गाजवले.

नाटक हे तसे ग्लॅमरचे क्षेत्र. रंगभूमीवर एका नाटकाचा प्रयोग होत असताना पडद्यामागे अनेक हात काम करत असतात. पण आपण फक्त रंगभूमीवर दिसणा-यांच्याकडेच लक्ष देत असतो. पडद्यामागे, बॅक स्टेज आर्टिस्ट असतात, लाइटवाले, साऊंडवाले, सेट लावणारे, मेकअप करणारे आणि कलाकारांना नाटकात लहानमोठी मदत करणारे असे अनेक जण त्यात काम करत असतात.
अशा सर्व कलाकारांसाठीच आठ षटकांची हापपीच टेनिस बाॅल क्रिकेटची स्पर्धा नुकतीच झाली. त्यात तब्बल 22 संघांनी भाग घेतला होता. प्रत्येक संघात किमान आठ खेळाडू होतेच. अनेक संघांनी स्वतचे टी शर्टस छापून घेतले होते. स्पर्धेचे उदघाटन शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड, डाॅ. सतीश देसाई यांच्या हस्ते झाले. स्पर्धेची संकल्पना बालगंधर्वचे व्यवस्थापक अमर परदेशी व बालगंर्धव परिवाराची होती. नाट्य परिषदेवर पहिल्यांदा निवडून आलेल्या माजी महापाैर शातिलाल सुरतवाला हे स्वतचा संघच घेऊन स्पर्धेत उतरले होते. त्यासाठी बक्षिसांचे प्रायोजकत्वही काही निर्माते मंडळी, व्यवस्थापक व कंत्राटदारांनी दिले होते.
एकूण तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत लाइटसाऊंडवाल्यांच्या संघाने विजेतेपद पटकावले. जितू वाईकर यांच्या जीत एंटरटेन्मेंट संघाने उपविजेतेपद तर बॅक स्टेज आर्टिस्टसच्या संघाने तिसरा क्रमांक पटाकावला. यांना अनुक्रमे अकरा, सात आणि पाच हजार रूपये रोख अशी बक्षिसे देण्यात आली. आश्चर्याची बाब अशी की या स्पर्धेतील एकमेव हॅट्रीक बॅकस्टेज संघातील सिध्दार्थ याने केल्याने त्यालाही एक हजार रूपयांचे ऱोख बक्षिस देण्यात आले. सुरूवातीला जाहीर केलेल्या बक्षिसांमध्ये याचा समावेश नव्हता.
या स्पर्धेला अखिल भारतीय नाट्य परिषद, नवरंग, स्वामी समर्थ, शिव मल्हार थिएटर, अर्थव म्युझिककल, भवानी प्राॅडक्शन, आनंदी-आनंद नाटकाची टीम, नाकोडा म्युझिकल कंपनी या सारख्या संस्थांनी सहकार्य केले होते.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.