Skip to content
जाहिरात

पुण्यात महिला ज्योतिषांचे पहिले संमेलन दि. १० आॅक्टोबरला

October 3, 2009

पुणे, दि. ३ (प्रतिनिधी) - सध्या ज्योतिष विषयाकडे वळणा-यंची संख्या वाढत आहे. त्यात महिला ज्योतिषांची संख्याही लक्षणिय आहे. त्यामुळेच या महिला ज्योतिषांचे अधिवेशन भरवण्याची संकल्पना येथे येत्या १० आॅक्टोबरला साकार होत आहे. या निमित्ताने उपा कांबळे यांना जीवन गाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ज्योतिषांची संमोलने सारखी कुठे ना कुठे होत असतात, पण खास महिला ज्योतिर्विदांचे संमेलन आजपर्यंत कोणीच भरवले नव्हते. त्यामुळे हे पहिले संमेलन ठरणार आहे. या संमेलनाच्या संयोजनाची जबाबदारी डॅा. शिल्पा अग्निहोत्री, डॅा. अरूंधती पोतदार, रजनी साबदे आणि सविता महाडिक यांनी घेतली आहे. या संमेलनाच्या निमित्ताने महिला ज्योतिर्विद दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपद जयश्री बेलसरे यांनी स्वीकारले असून उदघाटन मधुसुदन घाणेकर यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला डॅा, वि. शि. अष्टेकर व डॅा. कालिदास गोसावी उपस्थित रहाणार आहेत. यावेळी चंद्रकांत शेवाळे यांच्यासह तेरा जणांचा सत्कार करण्यात येणार आहे.
पहिल्या सत्रात जयश्री बेलसरे यांचे फलज्योतिष, सुनिता कुलकर्णी यांचे हस्तसामुद्रिक, अर्चना जोगदेव यांचे अंकज्योतिष व ऋचा घाणेकर यांचे हस्ताक्षर मनोविश्वेशण या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
दुस-या व खुल्या अधिवेशनात प्रा. स्मिता गिरी ( टॅरो), सुप्रिया अभ्यंकर (कृषणमूर्ती), वास्तूशास्त्र विषयावर संध्या जोशी यांची व्याख्याने होणार आहेत. शेवटच्या सत्रात उषा कांबळे यांचे अध्यात्माचे महत्व, अरती घाटपांडे मेडिकल अॅस्ट्रोलाॅजी, स्मिता गिरी महिला ज्योतिर्विद नैतिकता, रजनी साबदे हास्ययोग, शिल्पा अग्निहोत्री महिला ज्योतिर्विदांचे संघटन आणि भारती कोशे यांचे प्रश्न कुंडली या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
संमेलनाचा समारोप डॅा. सुहास डोंगरे आणि शरदचंद्र गोखले यांच्या उपस्थितीत होणार आहे. हे संमेलन दुपारी २ ते रात्री ८ या वेळात होणार असून ते सर्वांसाठी खुले आहे असे डाॅ. शिल्पा अग्निहोत्री यांनी सांगितले. या संमेलनाबाबत अधिक महितीसाठी संपर्क ०२० २४४५७८८९ किंवा ९८२३३२२११७.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.