Skip to content
जाहिरात

वेदपाठ शाळेच्या ६५ व्या वर्धापनदिना निमित्त वेदभवनात कार्यक्रम

October 23, 2009

पुणे, दि. २३ (प्रतिनिधी) - वेदाचार्य घैसास गुरूजी वेदपाठशाळाच्या ६५ व्या वर्धापनदिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन वेदभवनात करण्यात आले आहे. या निमित्त वेदपारायण, ऋग्वेद स्वाहाकार, पंचायतन जप अनुष्ठान अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.

हे सर्व कार्यक्रम येत्या रविवार (दि.25) पासून सुरू होत आहेत. ही वेदपाठशाळा वेदमहर्षि कै. विनायक भट्ट घैसास गुरूजी यांनी स्थापन केली आहे. या धार्मिक कार्यक्रमात वेदपाठशाळेचे आजीमाजी विद्यार्थी सहभागी होतात. हे सर्व कार्यक्रम दोन नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्रिपुरी पाैर्णिमेला वेदभावनात दीपोत्सव करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात वेदाचार्यांचे काम समाजापर्यंत पोचवण्यासाठी एक वेदपाठशाळेला सरस्वती उपासना पुरस्कार देण्यात येतो. या महोत्सवाची सांगता दि. 31ला होणार असून त्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता ऋग्वेद संहिता स्वाहाकाराची पूर्णाहुती होणार आहे. या वेदभवना बरोबरच दापोली तालुक्यातील केळशी गावी वेदपाठशाळा सुरू करून संस्थेने कामाच विस्तार केला आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.