

पुणे, (प्रतिनि्धी) - येत्या 21 ते 27 फेब्रुवारी दरम्यान समर्थ मराठी संस्थेतर्फे "मराठी आठवडा" साजरा करण्यात येणार आहे. तसा तो अन्य संस्थांनीही करावा असे प्रयत्न पुण्यातील समर्थ मराठी या संस्थेने सुरू केले आहेत. मराठी ही जागातील सर्वोत्तम भाषांपैकी एक आहे. ही भाषा जगभर पोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मराठी काका यांनी सांगितले.
ते म्हणाले, 21 फेब्रुवारी हा "जागतिक मातृभाषा दिन"असून 27 फेब्रुवारी हा
"जागतिक मराठी दिन"म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे हा संपूर्ण आठवडा मराठी
आठवडा म्हणून साजरा केला जावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी तयारी सुरु केली
आहे. भारत संचार निगम, रेल्वे, आय़ुर्विमा महामंडळ, राज्य शासनाची कार्यालये,
शाळा, महाविद्यालये, उद्योग, दुकाने, वित्तसंस्था, व्यापारी संस्था आणि
राजकीय-सामाजिक संघटनांनी हा मराठी आठवडा साजरा करावा यासाठी प्रयत्न करण्यात
येत आहेत.
उच्चार व लेखनात साम्य,अर्थवाही शब्दांची भरपूर संखा, कमी शब्दात अधिक विचार
संक्रमण, सामासिक शब्दांची रेलचेल, छपाई व लिखाणात जागातील अन्य भाषाच्या
तुलनेत कागद व शाईची 50 ते 70 टक्के बचत, वेळेत 40 ते 60 टक्के बचत या
वैशिष्ट्यांमुळे मराठी ही जगातील सर्वोत्तम भाषांपैकी एक आहे. ती आपली राजभाषा व
लोकभाषा आहे.
अशी एक श्रेष्ठ भाषा आपल्याला येते याची जाणिव महाराष्ट्रातून कमी होत चालली आहे.
गेल्या म्हणजे 19 शतकात देशात ऐंशी टक्के मराठी भाषा वापरली जात होती. ही
जाणिव टिकवणे व वाढवणे व आपल्यापेक्षा कमी सोयीच्या इंग्रजीस लॅटीन भाषा जिथे
वापरली जाते तेथे मराठी भाषा पोचवण्याच्या दूरगामी उदिष्ट ठेवूनच मराठी आठवडा साजरा
करण्याची संकल्पना पुढे आली आहे. तो कसा साजरा केला जावा याबाबत आपल्या काही
सूचना असल्यास marathikaka@gmail.com किंवा 09422001671
येथे मराठी काकांशी संपर्क साधावा. तसेच आपण या उपक्रमात सहभागी व्हावे व इतरांना
सहभागी करून घ्यावे असे आवाहन समर्थ मराठी संस्थेने केले आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या