

शाॅपिंग फेस्ट, दिवाळी पहाटच्या वेळी स्वाइन फ्लू परगावी गेला होता का?
पुणे, (प्रतिनिधी) - स्वाइन फ्लूमुळे यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव पुढे ढकलल्याचे
संयोजकांनी जाहीर केले होते. त्यानंतर आठवड्यातच यंदाचा सवाई गंधर्व महोत्सव 7 ते
10 जानेवारी दरम्यान रमण बाग शाळेच्या मैदानावर होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले
आहे. त्यामुळे यंदा पुण्यात नव्या वर्षाचे स्वागत सवाईच्या सूरांनी होणार आहे.
स
वाई गंर्धव महोत्सव ही सांस्कृतिक पुण्याची ओळख झाली आहे. सध्यातरी स्वाइन
फ्लूचे संकट दूर झाल्याचे नुकत्याच साज-या झालेल्या दिवाळीवरून स्पष्ट झाले
आहे.तसेच अनेकांनी या निमित्ताने शॅापिंग फेस्ट, प्रदर्शने, दिवाळी पहाट सारखे
उपक्रम राबवले. त्याला पुणेकरांनी प्रचंड गर्दी करून प्रतिसाद दिला.
दिवाळीचे आकाश दिवे काढण्यापूर्वीच रमण बाग शाळेच्या मैदानावर संगीत महोत्सव
झाला. त्याला उत्सव हवा पण गर्दी नको अशी गणेशोत्सवात भूमीका घेणा-यांनी
प्रायोजकत्व देऊन गर्दी जमा केली होती.त्यानंतर दिवाळी निमित्त शाॅपिंग फेस्टही झाले.
ते दिवाळी संपली तरी सुरूच होते. तेथे ग्राहकांनी केलेल्या गर्दीची छायाचित्रे प्रसिद्ध
झाली. कारण हे सर्वच उपक्रम कमर्शियली करण्यात आले असल्याने गर्दीशिवाय या
उपक्रमांना ग्रेसच येणार नव्हती. यातच यंदाचा सवाई गंधर्व संगीत महोत्सव पुढे
ढकलण्यात आल्याने रसीक नाराज झाले. त्यामुळे ही दिवाळीत व त्यानंतर झालेल्या
संगीत महोत्सवाला झालेल्या गर्दीच्यावेळी स्वाइन फ्लू कुठे परवागावी गेला होता का असा
टिपीकल पुणेरी सवाल रसीक करत होते.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या