Skip to content
जाहिरात

मराठी आठवडा साजरा करण्यासाठी पुण्यात तयारी सुरू

November 15, 2009

पुणे, (प्रतिनिधी) - जागतिक मातृभाषा दिन ते जागतिक मराठी दिन असा मराठी आठवडा साजरा करण्याची तयारी पुण्यात सुरू झाली आहे. त्यासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे.

दरवर्षी 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच प्रमाणे 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून हा संपूर्ण आठवडा मराठी आठवडा म्हणून का साजरा केला जाऊ नये अशी संकल्पना मराठी समर्थ या मराठी भाषेची चळवळ करणा-या संस्थेने मांडली. त्याला प्रतिसाद देत आज पंधरा मराठी प्रमींची औपचारीक बैठक झाली.
या बैठकीला मराठी समर्थचे अनिल गोरे, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, पुणे मराठी ग्रंथालयाचे मुकुंद अनगळ, दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे निर्माते अरूण काकतकर, अविनाश भोमे, महाराष्ट्र बँकेचे शाम भुरके, भाषांतरकार विजय पाध्ये, औद्योगिक सल्लागार सुनील पाटणकर, सलील कुलकर्णी, मराठी भाषा परिषदेचे नीलकंठ फडके आणि मातृभाषा कानडी असलेले मराठी प्रेमी मधुकर कोन्नूर, कैलास भिंगारे, विश्वास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत हा आठवडा कसा साजरा करायचा यावर चर्चा झाली. तसेच हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. याच्या प्रचारासाठी मराठी दौड, सायकल फेरी, फिरते व्यासरपीठ करून शहराच्या विविध भागात फिरवणे असे काही उपक्रम सूचवण्यात आले. मात्र त्या आठवड्यात 26 फेब्रुवारीला सावरकर गीतांचा कार्यक्रम करण्यावर सगळ्यांचे एकमत झाले आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.