Skip to content
जाहिरात

पुण्यात वाह्ताहेत सूरा ऐवजी साहित्या समेलनाचे वारे

November 23, 2009

पुण्यात वाहताहेत सूरांऐवजी साहित्याचे वारे
पुणे, (प्रतिनिधी)- सवाई गंधर्व सारख्या कार्यक्रम यंदा पुढे गेल्या नाराज झालेल्या पुणेकरांना साहित्य संमेलनाच्या वातमीने हायसे वाटले. त्यामुळे यंदाच्या पुण्याच्या गुलाबी थंडीत सुरांऐवजी साहित्याचे वारे पुण्यात वाहू लागले आहे.

पुण्यात दिवाळी झाली की सांस्कृतिक कार्यक्रमांचा हंगाम सुरू होतो. त्यात सवाई गंधर्वसारखा संगीत महोत्सव म्हणजे पुण्याचे भूषण ठरला आहे. खांद्यावर शाल टाकून सवाईला जाणे ही पुणेकरांची एक ओळख झाली आहे. दरवर्षी डिंसेंबर महिन्यात होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव यंदा पुढे ढकलल्याचे संयोजकांनी जाहीर केले त्यावर रसिकांच्यात नाराजीचा सूर उमटला होता.
त्यानंतर काही दिवसातच यंदाचे 83 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याच्या बातमीने रसिकांना हायसे वाटले आणि त्याच पाठोपाठ सुरू झाली ती संमेलनाध्यक्ष निवडीची चर्चा. त्यामुळे साहित्य संमेलन पुण्यात होणार यावर शिक्का मोर्तब झाले.
हे साहित्य संमेलन बीस वर्षानंतर पुण्यात होत आहे. यापूर्वी पुण्यात 36 वे साहित्य संमेलन झाले होते, त्यानंतर हे दोन्ही आकडे एकमेकांकडे बघत 63 वे संमेलनही झाले होते. त्यानंतर यंदाचे संमेलन होत आहे. एकीकडे महाराष्ट्राबरोबरच परदेशातही मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ याच पु्ण्यात रोवली गेली.त्यानंतर आता खुद्द आरिजिनल संमेलन पुण्यात होणार असल्याने रसिकांना यंदा चांगली पर्वणी लाभली आहे.
या संमेलानाच्या कार्यालयाचे उदघाटन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच झाले. हे संमेलन मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार सपमहाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. त्यासाठी डॉ. सतीश देसाई यांची स्वागताध्यक्ष तर रसिकराज उल्हास पवार यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

प्रतिक्रियां

प्रतिक्रिया द्या

येथे दिल्या गेलेली माहिती गोपनीय ठेवल्या जाईल. तुमच्या परवानगी शिवाय ती जाहिर केल्या जाणार नाही.