

पुणे, दि.४- साहित्यिकांच्या नावावर गर्दी होईल का नाही अशी शंका आल्यानेच आता पुण्यात होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी एकेक सेलिब्रेटिंना बोलवण्याचा सपाटा संयोजकांनी सुरू केला आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन पाठोपाठ आता अमिताब बच्चन यांना संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी त्यांचे वडिलांचे साहित्य असा विषय पुढे करण्यात आला आहे. त्यामुले हे संमेलन आता साहित्यिकांऐवजी सेलिब्रेटी गाजवणार हे नक्की.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वाद हे एकतर अध्यक्षपदावरून किंवा उद्घाटकांमुळे गाजले आहेत.त्यामुळे पुण्यातील सूज्ञ मंडळींनी संमेलनाचे उद्गाटन साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते करण्याचे सर्वांनी एकमताने ठरवले.त्यामुळे मराठी साहित्यातील योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्याचे ठरले तसे त्यांना दिलेले निमंत्रण त्यांनी तात्काळ स्वीकारले. तसेच त्यांच्या नव्या कविता वाचनाने संमेलनाचे उद्घाटन करण्याची कल्पना त्यांनी मांडली आहे. यामुळे एक नवी परंपरा पुढील संमेलनांना देण्यावरून मोठी प्रसिद्धीही संयोजकांनी मिळवली. काही दिवसांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे वडिल साहित्यिक होते असा नव्याने शोध संयोजकांना लागला. त्यामुळे त्यांनी सिचनला संमेलनाचे निमंत्रण दिले व वडिलांच्या कविता किंवा पुस्तकातील उतारे वाचण्याची विनंती केली. त्याने अद्याप होकार कळवलेला नाही. मात्र संयोजकांनी सिचनला वडिलांबद्दल किती आदर आहे हे तो प्रत्येक शकतानंतर कसा आकाशाकडे बघतो, त्याने शतक वडिलाना कसे अर्पण केले वगैरे वगैरे संयोजक सांगून सचिनला बोलवण्याचे समर्थन करत आहोत. मात्र त्याचवेळी यांना सचिन जगात फेमस त्याच्या नावाववर गर्दी होऊ शकते आणि प्रायोजक मिळू शकतात हेच त्याला बोलवण्यामागे कारण असल्याची प्रतिक्रीया रसिकांची आहे.
त्यानंतर संयोजकांनी बिग बी अमिताब बच्चन यांना निमंत्रित करून हरिवंशराय बच्चन यांच्या कविता वाचन करावे असे सांगितले आहे.मात्र त्यानेही अद्याप होकार कळवलेला नाही. खर तर बच्चन जेव्हा यशाच्या शिखरावर होते त्यावेळी त्यांनी कधीही वडिलांच्या कविता वाचनाचे कार्यक्रम केले नाहीत. पण जेव्हा बॅडपॅच आला तेव्हा लोकप्रियता पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी हे कविता वाचन सुरू केले. त्यांच्या जागी हरिवंशराय बच्चन असते व त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले असते तर ते रसिकांना मान्य होते कारण ते साहित्यिक होते. मात्र बच्चन यांचे ग्लॅमर कॅश करण्यासाठी त्यांना वडिलांच्या कविता वाचनासाठी मराठी साहित्य संमेलनात बोलवणे रसिकांना रूचलेले नाही. सचिन काय किवा बच्चन आज लोकप्रिय असल्याने त्यांचा साहित्य क्षेत्राशी संबंध जुळवून त्यांना बोलवण्यात येत असल्याचे मत काही रसिकांनी व्यक्त केले. त्यामुळे या संमेलनात साहित्याऐवजी ग्लॅमरवर भर असणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी कोणत्याही मराठी साहित्य संमेलनात अशा प्रकारे साहित्यिक, कवींना महत्व देण्यात येत होते. मात्र गेल्यावर्षीच्या महाबळेश्वरच्या संमेलनापासून त्यातील काही संदर्भ बदलले आहेत. त्या संमेलनाला अध्यक्षच नव्हते. मात्र साहित्य महामंडळाने तसेच विना अध्यक्षांचे संमेलन करून दाखवले आहे. त्यामुळे यापुढेसंमेलनाऐवजी अखिल मराठी साहित्य फेस्टीव्हल असेच नाव द्यावे अशी टिपीकल पुणेरी प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली आहे.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.

प्रतिक्रियां
प्रतिक्रिया द्या