

पुणे दि. 23 (प्रतिनिधी) - रोज पुण्यातील ताज्या घडामोडींची महिती तसेच अन्य जिव्हाळ्याच्या विषयांची महिती देणारी ईन्यूजपुणे डॉट कॉम ही वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव गोडसे यांनी आज क्लिक करून ही वेबसाइट लोकांसाठी खुली केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना आज डॉ. माशेलकर व वैशाली माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आली. या निमित्ताने गणेश महालात विज्ञान व अध्यात्माचा मिलाफ झाला होता. हेच औचित्य साधून ईन्यूजपुणे ही वेबसाइट त्यांच्या हस्ते खुली करण्यात आली.
या वेबसाइटवर पुण्यातील रोजच्या ठळक घडामोडी असतील. तसेच छायाचित्रे असतील. त्याच बरोबर कोणाला बातमी कळवायची असले तर त्यासाठी सिटिझ्न्स जर्नेलिस्ट म्हणून जागा देण्यात आली आहे. तेथे आपल्याला समजणारी महिती किंवा बातमी आपण टाइप केली तर ती आमच्यापर्यंत पोचेल. आठवड्यातील महत्वाच्या ग्रहयोगांचे राशी फलही जातक या सदरात देण्यात येणार आहे. या शिवाय राजकारण, सांस्कृतिक,गुन्हेगारी जगतातील घडामोडी असांस्कृतिक सदरात देण्यात येणार आहेत. पुण्यात गल्लोगल्ली चांगली चवदार छोटी हॉटेल्स किंवा स्टॉल्स आहेत त्याची महिती खाऊगल्लीत मिळेल.
२१ फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिन ते २७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिन असे सात दिवस मराठी आठवडा साजरा केला जाणार आहे. त्या संबंधी माहिती.
